पर्याय सामाजिक संस्था आणि महाराष्ट्र लोकविकास मंचच्या वतीने पत्रकारांसाठी गेट-टुगेदर उत्साहात संपन्न

जयनारायण दरक / कळंब
तालुक्यातील पर्याय सामाजिक संस्था आणि लोकविकास मंचच्या वतीने खास पत्रकार बांधवांसाठी शनिवार दिनांक 9 डिसेंबर 2023 रोजी पर्याय संस्थेच्या प्रशिक्षण केंद्राच्या सभागृहात सर्व पत्रकार मित्रांसाठी स्नेह मिलन व छोटेसे गेट-टुगेदर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र लोक विकास मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय विश्वनाथ अण्णा तोडकर व महाराष्ट्र लोक विकास मंचचे राष्ट्रीय सचिव आदरणीय भूमिपुत्र वाघ,संघटक रमाकांत कुलकर्णी, राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हस्कु नाथु कोंढाळकर,अनिता ताई तोडकर, कोषाध्यक्ष मनीषा घुले,एकल महिला संघटक सुनंदाताई खराटे,विद्याताई वाघ यांची प्रमुख उपस्थित होती यावेळी विश्वनाथ अण्णा तोडकर यांनी प्रास्ताविक भाषणात म्हणाले की गेट-टुगेदर ही संकल्पना कळंब शहरात दोस्ती ग्रुपने तीन वर्षांपासून गेट-टुगेदर हा कार्यक्रम कळंब येथे घेतला जात होता ती संकल्पना ठेवून मी खास पत्रकारांसाठी गेट टुगेदर या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे या सभागृहामध्ये सर्वांना खुली चर्चा करण्यात येईल तसेच पुढे बोलताना म्हणाले की शासनाने शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पेरणी ते कापणीचा प्रयोग रोजगार हमी योजनेतून करावा कारण त्या योजनेतून हा प्रयोग यशस्वी झाला तर शेतकऱ्यांना रोजगार मिळेल मजुरांना रोजगार मिळेल व शेतकरी आत्महत्या थांबतील याविषयी पत्रकारांनी बातम्यांच्या माध्यमातून प्रसिद्धी करून शासनापर्यंत हा आवाज उठवला पाहिजे तसेच पर्याय संस्थेच्या माध्यमातून पहिल्यापासून ते आतापर्यंत पूर्ण माहिती पत्रकारांसमोर माहिती देऊन या संस्थेच्या वतीने विधवा महिला,एकल महिला,बचत गट या संस्थेच्या वतीने आजपर्यंत मदत केली आहे यापुढे महिला सोबतच शेतकऱ्यांचे प्रश्न मिटविण्यासाठी ही संस्था पुढील काळात प्रयत्न करणार आहे यावेळी भूमिपुत्र वाघ यांनी पण पत्रकारांना मोलाचे मार्गदर्शन करून महाराष्ट्र लोक विकास मंचाच्या व पर्याय संस्थेच्या माध्यमातून पुढील काळात शेतकरी यांनी आत्महत्या करू नये व व्यसनाधीन जात असलेल्या तरुण व तरुणी विषयी आणि महिला सह पूर्ण राज्यात योजना राबविण्याचा प्रयत्न करणार आहोत असे आश्वासन दिले तसेच पत्रकारांनीही त्यांना खुलेआम चर्चेमध्ये प्रश्न विचारले त्या प्रश्नाचे अण्णांनी चांगल्या प्रकारे उत्तरे देऊन व खुलेआम चर्चा करण्यात आली यावेळी पत्रकार संघाचे विश्वस्त सतीश बाप्पा टोणगे, बालाजी बप्पा अडसूळ, सतीश मातने सर,पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक भाऊ शिंदे, दत्तात्रय बापु गायके (तेरणा काठ सा.चे संपादक),लक्ष्मण शिंदे,पांडुरंग मते,परमेश्वर पालकर सर यांनी चर्चेमध्ये भाग घेऊन सहभाग नोंदवुन हशा मज्जाक करून यावेळी पत्रकारांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी व्हाईस ऑफ मेडिया मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष अमर चौंदे, कळंब तालुका पत्रकार संघाचे विश्वस्त सतीश टोणगे, पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक भाऊ शिंदे, सतीश मातने, परमेश्वर पालकर, प्रा.विलास मुळीक, पांडुरंग मते, राजेंद्र बारगुले, महेश फाटक, आश्रुबा कोठावळे, प्रवीण तांबडे, मंगेश यादव, सलमान मुल्ला, रामराजे जगताप,आविनाश घोडके, लक्ष्मण शिंदे, दीपक बारकुल, जयनारायण दरक व तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांनी गेट-टुगेदर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून स्नेहभोजनाचा स्वाद घेतला व आभार बालाजी बप्पा आडसुळ यांनी मानले.