ताज्या घडामोडी

येरमाळा गावकऱ्यांच्या वतीने २० डिसेंबर रोजी मेघा कंपनीच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन

– मेघा कंपनीचे माजलगाव, कुसळबं या राष्ट्रीय महामार्गाचे काम २०१८ सालापासून संथ गतीने चालू आहे. येरमाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोरील व घाटातील रस्त्याचे काम अद्यापही पूर्ण झालेले नसून खराब रस्त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
तसेच गावातील रस्त्याच्या दोन्ही बाजूची नाली, फूटपाथ तसेच लाईट चे काम अद्यापही पूर्ण नाही. गावातील नागरिकांनी वारंवार तोंडी, लेखी सांगूनही मेघा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे.
संतप्त गावकऱ्यांच्या वतीने २० डिसेंबर २०२३ रोजी कंपनीच्या विरोधात रास्ता रोको करण्याचे निवेदन देण्यात आले असून त्यावर अनिल पवार, निशिकांत गायकवाड, राहुल पाटील, लहू पाटील, मुन्ना मोरे यांच्यासह अनेक गावकऱ्यांनी सह्या केल्या आहेत धाराशिवचे जिल्हाधिकारी सचिन ओम्बांसे यांना निवेदन दिले असून येरमाळा गावकऱ्यांच्या वतीने २० डिसेंबर रोजी मेघा कंपनीच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.