ताज्या घडामोडी

ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचा सत्कार

कळंब/ जयनारायण दरक

-धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी दिनांक 14 डिसेंबर रोजी कळंब पोलीस स्टेशन इन्स्पेक्शन साठी आले असता त्यांचा ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने शाल व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी त्यांनी ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला जेष्ठ नागरिकांच्या वतीने त्यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले या निवेदनात कळंब शहरासाठी स्वतंत्र पोलीस स्टेशन असावे ,उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक यांच्यासाठी निवासस्थानाचे निर्माण करावे तसेच पोलीस कर्मचाऱ्यांसाठी नवीन प्रस्तावित निवासस्थानाचे काम त्वरित सुरू करण्याविषयी कार्यवाही करावी, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील जुनी पोलीस चौकी पुन्हा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे याप्रसंगी प्रकाश (काका) भडंगे, महादेव महाराज अडसूळ ,माधवसिंग राजपूत संपतराव कसबे ,कल्याण लोळगे, मधुकर शीलवंत, सचिन डोरले ,संतोष लोंढे ,नवनाथ भंडारे यांची उपस्थिती होती

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.