शेतात होत आहेत चोऱ्या :: खोंदला परीसरात शेतकरी वर्गात भिती

कळंब/जयनारायण दरक
कळंब तालुक्यातील खोंदला या गावांमध्ये शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण आहे .कारण महिना भरामधील बोरवेलची कप्पी फवारा वायर चोरी होण्याची दुसरी घटना आहे.
बोरवेल ची कप्पी आणि फवारा चोरी प्रकरणी तपास सुरू असतानाच दुसरी घटना घडली
याबाबत सविस्तर असे की खोदला गावातील शेतकरी नामे बालासाहेब अरविंद लांडगे हे दिनांक 9/3/ 2024 दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास शेत गट नंबर ११अ असलेल्या बोर बोअर वेल मध्ये बिघाड झाल्यामुळे बोरवेल मध्ये सोडलेल्या निळ्या का ल्या रंगाची वायर अंदाजे नऊशे फूट लांबीचे बोर मधून काढून बोर शेजारी ठेवून सायंकाळी सहा वाजता ते घरी आले असता दिनांक 10 /3 /2023 रोजी सकाळी 11 वाजता ते शेतात गेले शेतात गेल्यानंतर त्यांच्या असे लक्षात आले की आपण रात्री बोरवेल चे वायर काढून ठेवले होते ते वायर चोरून नेले आहे असे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशन कळंब येथे तक्रार दाखल केली त्यांच्या तक्रारीवरून अज्ञाताविरुद्ध भारतीय दंड संहिता 1860 नुसार कलम 379 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला साधारण त्यांचे 15000 रुपयांचे नुकसान झालेले
महिनाभरात चोरीच्या दोन घटना घडल्यामुळे शेतकरी वर्गामधून गस्त वाढवण्याची खंत व्यक्त करण्यात येत आहे .