राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा गटाच्या) धाराशिव जिल्हा अल्पसंख्यांक सेलच्या उपाध्यक्षदी जाफरभाई शेख यांची निवडी झाल्याबद्दल येरमाळा येथे मित्रपरिवार व मित्रपक्ष याच्या वतीने जंगी सत्कार

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा गटाच्या) धाराशिव जिल्हा अल्पसंख्यांक सेलच्या उपाध्यक्षदी जाफरभाई शेख यांची निवडी झाल्या बद्दल येरमाळा येथे मित्रपरिवार व मित्रपक्ष याच्या वतीने त्यांचा जंगी नागरी सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार जाफरभाई शेख यांची नुकतीच निवड झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेल जिल्हा उपाध्यक्ष धाराशिव अजितदादा गट यांचा नागरी सत्कार करण्यात आला त्यावेळी निशिकांत बापू गायकवाड, अनिल तात्या पवार, संचालक माजी सैनिक नागरी पतसंस्था कळंब चे चेअरमन सत्यनारायण पुरी, रामजीवन बोंदर, नितीन बारकुल, बंडू लोहार परसराम गुरव, माजी ग्रामपंचायत सदस्य. यावेळी उपस्थित मंडळींनी जाफर भाईचे राजकीय उज्वल भविष्य व्हावे अशा त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देऊन त्यांच्या हातून सर्वसामान्य गोरगरीब जनतेची सेवा घडावी अशा अपेक्षा यावेळी व्यक्त केल्या.