ताज्या घडामोडी

येरमाळा पोलीस स्टेशनच्या वतीने रस्ता सुरक्षा जनजागृतीकरिता प्रभातफेरीचे आयोजन

धाराशिवचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून अप्पर पोलीस अधीक्षक गौहर हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी गौरीप्रसाद हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. १९/१२/२०२३ रोजी सकाळी १०:०० वाजेच्या सुमारास पोलीस स्टेशन येरमाळा यांचे विद्यमानाने रस्ता सुरक्षा जनजागृतीकरिता ज्ञानोद्योग विद्यालय, येरमाळा यांच्या सहयोगाने येरमाळा गावामध्ये प्रभातफेरी काढण्यात आली. सदर प्रभातफेरी दरम्यान रस्त्यावरील नागरिकांना रस्ता सुरक्षेकरिता वाहतुकीच्या नियमाबाबत सूचना देण्यात आल्या. विद्यार्थ्यांच्या मार्फतीने वाहनचालक नागरिकांना पुष्पगुच्छ देऊन वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत विनंती करण्यात आली. सदरील प्रभात फेरीमध्ये येरमाळा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी स.पो.नि.अतुल पाटील, पो.उप.नि.. विलास जाधव, पो.उप.नि. स्वप्नील भोजगुडे, पोलीस कर्मचारी, ज्ञानयोग विद्यालय येथील २०० विद्यार्थी, शिक्षकवृंद उपस्थित होते.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.