तहसीलदारांचा ड्राईव्हर लाच घेताना रंगेहाथ पकडल्याने एकच खळबळ उडाली असुन याचे धागेदोरे कुठपर्यंत ?

वाळूचीवाहतूक देण्यात यावी यासाठी 8 हजार रुपयांची लाज घेताना कळंब येथील तहसीलदारांच्या ड्राईव्हरला लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे.
तहसीलदारांचा ड्राईव्हर लाच घेताना रंगेहाथ पकडल्याने एकच खळबळ उडाली असुन याचे धागेदोरे कुठपर्यंत आहेत हे पोलीस तपासत आहेत.
तक्रारदार हे ट्रॅक्टरने वाळु वाहतुक करतात, यातील आरोपी लोकसेवक अनिल सुरवसे हे कळंब तहसिलदार यांच्या वाहनावर वाहन चालक असून त्याने तक्रारदार यांना वाळु वाहतुक करुन देण्यासाठी व वाळुचे ट्रॅक्टरवर कोणतीही कारवाई न करण्यासाठी 19 डिसेंबर रोजी पंचांसमक्ष तक्रारदार यांच्याकडे महिन्याला हप्ता म्हणुन 15 हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती 8 हजार रुपये लाच रक्कमेची मागणी केली व लाच रक्कम तक्रारदार यांचेकडुन पंचांसमक्ष स्विकारल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले असुन पोलीस स्टेशन कळंब येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पोलीस अधीक्षक संदीप आटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी म्हणून पोलीस उपअधीक्षक सिद्धाराम म्हेत्रे यांनी कारवाई केली. सापळा पथकात पोलीस अमलदार दिनकर उगमुगले, सचिन शेवाळे, नागेश शेरकर, चालक दत्तात्रय करडे यांचा समावेश होता.
लोकसेवक अथवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी व्यक्ती कायदेशीर काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तर 02472 222879 व टोल फ्री फ्री क्रमाक 1064 यावर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.