व्हॉइस ऑफ मीडियाच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी श्रीकांत मडके यांची निवड

जयनारायण दरक/ कळंब
कळंब(प्रतिनिधी): व्हॉइस ऑफ मीडिया कळंब तालुका आज दि.25/12/2023 रोजी एम.डी.लाईव्ह कळंब कार्यालयात दुपारी 1 वाजता आयोजित केलेल्या आढावा बैठकीत अमर चोंदे मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष व धाराशिव जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे,रणजीत गवळी अध्यक्ष कळंब तालुका व्हाईस ऑफ मीडिया यांच्या मार्गदर्शनाखाली नूतन पद अधिकारी यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली यामध्ये श्रीकांत मडके यांची जिल्हा कार्याध्यक्षपदी, शिवप्रसाद बियाणी यांची कळंब तालुका व्हॉइस ऑफ मीडिया उपाध्यक्षपदी तर अविनाश सावंत यांची सरचिटणीस पदी निवड करण्यात आली.
सविस्तर वृत्त असे की कळंब तालुक्यातील व्हाईस ऑफ मीडिया पदाधिकारी यांची बैठक आज दिनांक 25 डिसेंबर रोजी एम.डी लाईव्ह कार्यालय देवी रोड येथे पार पडली यावेळी सर्व पदाधिकारी यांच्या बहुमताने वरील पदाधिकारी निवड करण्यात आली यावेळी व्हाईस ऑफ मिडियाचे कळंब तालुका कार्याध्यक्ष रामरतन कांबळे, उपाध्यक्ष रामराजे जगताप, डिजिटल मीडिया कळंब तालुका अध्यक्ष अमोल रणदिवे कोषाध्यक्ष सतीश तवले, राजेश पुरी,दिपक माळी प्रसिद्धीप्रमुख समाधान जाधव,अशोक कुलकर्णी, व इतर व्हाईस ऑफ मीडियाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते
या आढावा बैठकीत विविध विषयावर चर्चा करण्यात आली व मार्गदर्शन करण्यात आले.