ताज्या घडामोडी

कळंब येथील संत ज्ञानेश्वर महाराज शाळेत महाराजा यशवंतराव होळकर यांचा राज्याभिषेक सोहळा दिन साजरा

कळंब तालुक्यातील संत ज्ञानेश्वर महाराज मुकबधीर शाळेत महाराजा यशवंतराव होळकर यांचा राज्याभिषेक सोहळा दिन व यशवंत सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांच्या वाढदिवसानिमित्त फळे वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.दादाराव गुंडरे होते तर दीपक हारकर , सूभाष मैंदाड,दिंगबर कस्पटे, संतोष घाटुळे, दत्तात्रय गायके, संभाजी हारकर, सचिन हारकर, दिगंबर हारकर, बाळासाहेब दुगाने,यांची प्रमुख उपस्थिती होती, यावेळी प्रा.गुंडरे सर यांनी मल्हारराव होळकर यांच्या जीवनातील काही आठवणी सांगुन उपस्थितांना त्यांच्या कार्याची माहिती दिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजित गायके, सुत्रसंचलन डॉ.अशोक शिंपले तर शेवटी आभार संतोष घाटुळे यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी बंडू लांडगे ,अक्षय भंडारे, सतिश वैद्य, महादेव हाजगुडे, यांच्यासह आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.