ताज्या घडामोडी

राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे जिल्हा उपाध्यक्ष समाधान बाराते यांनी आ. कैलास पाटील यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश

कळंब तालुक्यातील येरमाळा जवळील बारातेवाडी येथील युवक नेते समाधान बाराते यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे

हिंदुत्वाची शान हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या कुशल नेतृत्वावर विश्वास ठेवून, खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे जिल्हा उपाध्यक्ष समाधान बाराते यांनी आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. यावेळी शिवसेना पक्षाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सर्वसामान्यांचे प्रश्न आपण सोडवाल आणि हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार शेवटच्या घटकापर्यंत पोहचवून शिवसेना संघटना बळकट कराल, असा विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी बाजार समिती संचालक हणमंत बापू आवाड, माजी पंचायत समिती सदस्य रामहरी बप्पा मुंडे, विभागप्रमुख राहुल पाटील, रमेश मुंडे, बालाजी सांगळे सरपंच चुंब, नरसिंग पाटील, पांडुरंग जाधवर आदि उपस्थित होते.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.