ताज्या घडामोडी
लोहटा (पु.) येथे आशा कार्यकर्ती निवडी मध्ये देणंघेणं व्यवहार झाल्याच्या संशयावरून चौकशीची मागणी

कळंब प्रतिनिधी
आशा कार्यकर्ती निवडी मध्ये भ्रष्टाचार झाला असून याची सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी लोहटा (पु.) येथील शबानाबी इस्माईल तांबोळी यांनी निवेदनाव्दारे तालुका वैद्यकिय अधिकारी कळंब यांना केली असून दि. १६ जानेवारी पासून तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालय समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा निवेदनाव्दारे देण्यात आला आहे.