ताज्या घडामोडी

मुलांना नव्हे, आधी स्वत:ला शिस्त लावा : प्रा. सोमनाथ लांडगे

धाराशिव तालुक्यातील शिंगोली येथे विद्यार्थी व पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. या विद्यार्थी व पालक मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून श्री साई श्रध्दा एज्युकेशन नीट ऑनलाईन टेस्ट सीरिजचे संचालक प्रा. सोमनाथ लांडगे उपस्थित होते. यावेळेस विद्यार्थ्यांच्या प्रगतीस कोणकोणत्या आमची आहेत यावर प्रा. सोमनाथ लांडगे यांनी विचार व्यक्त करताना पालकांनी आपल्या मुलांसोबत एकरूप झाले पाहिजे. मुलांनी शिस्तबद्ध राहवे असे सर्वच पालकांकडून अपेक्षीत असते पण मुले पालकांच्या वर्तनातून अनुकरणाने बर्‍याच गोष्टीं शिकत असतात त्यामुळे पालकांनी मुलांना नव्हे, आधी स्वत:ला शिस्त लावा असे प्रतिपादन केले. आपला मुलगा डॉक्टर, इंजिनिअर वा अधिकारी व्हावा असे वाटत असेल तर teen ages मध्येच त्याची सर्वच विषयाची बेसिक तयारी करून घ्यावी लागेल. आपला मुलगा वा मुलगी यशस्वी झाली पाहीजे हे अगोदर पालकांना वाटले पाहिजे व त्यानुसार मुलांची तयारी करून घेतली पाहिजेत असे प्रा. सोमनाथ लांडगे यांनी मार्गदर्शन करत असताना सांगीतले.
पालक विद्यार्थ्यी मेळाव्याच्या सुरूवातीला प्रा. दमयंती पाटील यांनी प्रा. सोमनाथ लांडगे यांचा सत्कार करून प्रास्ताविक केले. उपस्थित लहान मुलांनी अनोख्या पध्दतीने प्रा. सोमनाथ लांडगे यांचे स्वागत केले..

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.