ताज्या घडामोडी

धाराशिव जिल्ह्यात हिंसक वळण संचारबंदी लागू

 

जयनारायण दरक———————

मराठा समाजाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने धाराशिव जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात असून, याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी काढला आहे.
मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी मनोज जरांगे – पाटील यांनी आमरण उपोषण सुरु केल्यानंतर त्यांना पाठींबा देण्यासाठी जिल्हाभरात राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली तसेच अनेक ठिकाणी कॅण्डल मोर्चा काढण्यात आला. तसेच अनेक ठिकाणी रस्ता रोको आंदोलन कऱण्यात आले. या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने तसेच एसटीची जाळपोळ केल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी संचारबंदी लागू केली आहे.
या संचारबंदीतून शासकीय तसेच निम शासकीय कार्यालये, दुध वितरण, पिण्याचे पाणी पुरवठा, बँका , रस्ते वाहतूक आणि रेल्वे व्यवस्था दवाखाने, विद्युत पिरवठा, प्रसार माध्यमे यांना वगळण्यात आले आहे
उमरगा तालुक्यातील तुरोरी येथे कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाची बस जाळली

शिंगोलीजवळ रास्ता रोको केल्याने वाहनाच्या प्रचंड रांग

एसटीवर दगडफेक .

ढोकी :फिर्यादी नामे- धर्मराज राजेंद्र मोरे, वय 46 वर्षे, व्यवसाय- बस चालक, धाराशिव आगार, रा. सातेफळ, ता. कळंब जि. धाराशिव हे लातुर ते धाराशिव बस क्र एमएच 20 बीएल 1623 ही घेवून जात असताना दि. 29.10.2023 रोजी 13.30 वा. सु. पेट्रोलपंप ढोकी बसस्टॉप येथे प्रवांशाना उतरवण्याकरीता बस थांबली असता आरोपी नामे-1) अविनाश माणिक लंगडे, 2) सचिन बापूराव लंगडे दोघे रा. ढोकी ता. जि. धाराशिव व इतर 2 अनोळखी इसम यांनी दगड हातात घेवून बसवर मरत असताना फिर्यादी हे म्हणाले की दगड मारु नका असे म्हणत असताना नमुद व्यक्तीने तु गप्प बस अशी दमदाटी करुन बसचे समोरील काचेवर दगड मारुन बसचे काच फोडून 10,000₹ नुकसान केले. अशा मजकुराच्या फिर्यादी- धर्मराज मोरे यांनी दि.29.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे कलम 427, 186 भा.दं.वि.सं. सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंध अधिनियम कलम 3 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव :फिर्यादी नामे- किरण विशाल शिंदे, वय 39 वर्षे, व्यवसाय- बस चालक, कळंब आगार, रा. बावी, ता. जि. धाराशिव हे बस क्र एमएच 14 बीटी 2029 ही घेवून जात असताना दि. 29.10.2023 रोजी 16.15 वा. सु. येडशी बसस्थानक येथे प्रवांशाना उतरवण्याकरीता बस थांबली असता आरोपी नामे- दत्ता मोहन तुपे, वय 30 वर्षे, रा. येडशी ता. जि. धाराशिव व इतर अनोळखी इसमांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देवून बसचे समोरील काचेवर दगड व आग विजवण्याचे सिलेंडर मारुन बसचे समोरील व बाजूचे काच फोडून 30,000 ₹ नुकसान केले. अशा मजकुराच्या फिर्यादी- किरण शिंदे यांनी दि.29.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो. ठाणे येथे कलम 427 भा.दं.वि.सं. सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंध अधिनियम कलम 3, 4 अन्वये गुन्हा नोंदवला आहे

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.