महाराजस्व अभियानांतर्गत भटके विमुक्त जाती व जमाती आदिवासी व्यक्तींना जातीचे दाखले शिबिरातून मिळावेत
श्रमिक मानवाधिकार संघटनेची मागणी

जयनारायण दरक कळंब (प्रतिनिधी)
श्रमिक मानवाधिकार संघटनेच्या वतीने कळंब उपविभागीय अधिकारी सचिन पाटील व कळंब तहसीलदार प्रियवंदा म्हाडदळकर यांना निवेदन देण्यात आले असून या निवेदनात महाराजस्व अभियान अंतर्गत भटके विमुक्त जाती व जमाती आदिवासी जातीच्या व्यक्तींना जातीचे दाखले प्रदान करण्यासाठी शिबिराचे आयोजन करून जातीचे दाखले देण्यात यावेत, भटक्या विमुक्त जाती व जमाती आदिवासी जातीच्या मुला मुलींना जातीचे दाखले नाहीत त्यामुळे शिक्षण तसेच कार्यालयीन कामकाज यासाठी अडचण येत आहे. असे नमूद करून शिबिराच्या माध्यमातून जातीचे दाखले प्रदान करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर श्रमिक मानवाधिकार संघाचे संस्थापक अध्यक्ष भाई बजरंग ताटे , मानवीहक्क अभियान च्या जिल्हाध्यक्षा सौ माया शिंदे,मानवहित लोकशाही पक्षाचे जिल्हाध्यक्ष हनुमंत पाटुळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.