ताज्या घडामोडी

येरमाळा येथे श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठानिमीत्त येडाई देवीची पंच्चोपचार पुजा व आरती

अयोध्येतील मंदिरात श्री रामाच्या मृर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार असल्याचे औचित्य साधून येरमाळा येथील श्री येडेश्वरी मंदीरारत देवीची महापंच्चोपचार महापुजा करण्यात येऊन अयोध्या येथुन आलेल्या श्री रामाच्या मुर्तीची अभिषेक व पुजा करण्यात आली
आज अयोध्या येथे श्रीरामाच्या जन्मस्थळी प्रभुरामाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली या प्रतिष्ठापणाचे औचित्य साधुन ग्रामीण भागातील ग्रामदैवत लहान मोठी मंदिरे या ठिकाणी हा सोहळा आनंदात साजरा करण्यात आला .येरमाळा येथील श्री येडेश्वरी देवीच्या अख्यायिकेनुसार श्रीरामामुळेच येडाई असे म्हटले जात असल्याने श्रीराम मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठापणा कार्यक्रमानिमित्त येडेश्वरी मंदिरात देवीची राहुल पाटील,प्रमोद पाटील,विकास बारकुल,दत्ता बारकुल,सोमनाथ बारकुल,औंकार जोशी ,महेश बेदरे यांच्या हस्ते महापुजा,महाआरती करण्यात आली यावेळी उपसरपंच गणेश बारकुल,मदन बारकुल,देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बापुसाहेब बेदरे,उपाध्यक्ष संजय आगलावे,सचिव राजाभाऊ बेदरे यांच्यासह देवस्थानचे पदाधिकारी,रामभक्त, भाविक उपस्थित होते यावेळी रामक्ताना देवस्थान ट्रस्टच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी गावासह पंचक्रोशितील भाविक,महीला भाविक मोठ्या संख्येने उस्थीत होते.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.