ताज्या घडामोडी
बीड येथील महाविद्यालयातील सहकार विषयावर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सहलीने दिली येरमाळा येथील जनहीत पतसंस्थेस भेट

जानेवारी महिना हा अभ्यास सहलीचा महीना असून विद्यार्थी ज्या विषयात शिक्षण घेऊन अभ्यास करतात त्या क्षेत्रातील प्रगत अशा ठिकाणी जाऊन तेथील प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी महाविद्यालये सहलीचे आयोजन करत असतात यामध्ये बीड येथील बलभीम महाविद्यालय येथील सहकार या विषयाची शैक्षणिक अभ्यास सहलीची जनहित पतसंस्थेला भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली यावेळी संस्थेचे व्यवस्थापक शिवप्रसाद घेवारे यांनी पतसंस्थेत होत असलेल्या दैनंदिन कामकाजाची माहिती दिली व सहकार नियम व त्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली यावेळी प्राचार्य प्रा.डाॅ.बी.डी.जाधवर वल्लभ माशाळकर, अमोल पाटील यांच्यासह संस्थेचे कर्मचारी उपस्थीत होते.