येरमाळा येथे सचिन भाऊ साठे यांचा समाजबांधवांच्या वतीने सत्कार

कळंब (प्रतिनिधी) कळंब तालुक्यातील येरमाळा येथे रत्नापुर चे सरपंच सुनील (बापु)वाघमारे यांच्या हस्ते साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नातु सचिन भाऊ साठे हे धाराशिव जिल्हा दौ-यावर दि.२७जानेवारी रोजी आले असता त्यांचा सत्कार करण्यात आला. सचिन भाऊ साठे यांच्या हस्ते तुळजापूर येथे अण्णाभाऊ साठे क्रांती फोर्स या सामाजिक संघटनेच्या शाखा उद्घाटन कार्यक्रमासाठी आले होते.या वेळी धाराशिव जिल्ह्यांमध्ये संघटनेच्या वतीने विविध ठिकाणी बैठका घेऊन पदाधिकारी यांच्या नियुक्ती करण्यात आल्या आहेत. सचिन भाऊ साठे हे येरमाळा येथे आले असता त्यांचा सत्कार सरपंच सुनील (बापु) वाघमारे यांच्या हस्ते शाल श्रीफळ व फेटा बांधून करण्यात आला. या वेळी पुणे जिल्हाध्यक्ष विलास झोंबाडे, मराठवाडा उपाध्यक्ष हनुमंत भाऊ पाटुळे,बीड जिल्हाध्यक्ष हनुमान नाना क्षिरसागर,कळंब तालुका अध्यक्ष धनंजय भाऊ ताटे, यांची नुतन निवडी झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार या प्रसंगी करण्यात आला. या वेळी दुग्ध उद्योजक दिपक वाघमारे,अनुपम वाघमारे, दिपक ओव्हाळ, बाळासाहेब चंदनशिवे ,मच्छिंद्र (बापु) टेकाळे,बाबु जाधवर,हर्षद चंदनशिवे,रोहन खलसे, सुरेश (आण्णा) टेकाळे यांच्या सह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.