ताज्या घडामोडी
धाराशिव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी राजू कांबळे यांनी नुकताच पदभार स्विकारल्यानंतर जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांच्या वतीने शुभेच्छा व सत्कार

धाराशिव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी राजू कांबळे यांनी गटविकास अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला असल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात)पक्षाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व पुढील कामकाजास हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत,ज्येष्ठ नेते बाबासाहेब बनसोडे, धाराशिव तालुकाध्यक्ष संपत सरवदे, समाधान सरवदे, कौडगाव ग्रामपंचायत सदस्य मारुती थोरात, बेंबळी ग्रामपंचायत सदस्य ,जिंदाशहा शेख, राहुल लांडगे, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते