ताज्या घडामोडी

35 वा रस्ता सुरक्षा अभियान 2024 चा समारोप चित्ररथ व मोटार ड्रायव्हींग स्कूल कार रॅलीचे आयोजन

धाराशिव ::: रस्ता सुरक्षेच्या अनुषंगाने चित्ररथ व मोटार ड्रायव्हींग स्कूल कार रॅलीचे आयोजन करण्यात आले. सदर प्रसंगी मा. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. गजानन नेरपगार यांनी कार्यालयाच्या मुख्य द्वार येथे चित्ररथ व कार रॅलीस हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन केले व रॅली मार्गस्थ करण्यात आली.
धाराशिव शहरातील विविध ठिकाणी MIDC चौक, तेरणा कॉलेज रोड, शाहु चौक, ज्ञानेश्वर मंदिर रोड, सेंट्रल बिल्डींग, सह्याद्री हॉस्पीटल कॉर्नर, बार्शी नाका, अंाबेडकर चौक, शिवाजी चौक, बसस्टँड, जिल्हा कोर्ट व वापस सेंट्रल बिल्डींग, या मार्गाने जाऊन शहरातील नागरीकांना रस्ता सुरक्षेच्या अनुषंगाने चित्ररथ व कार रॅलीद्वारे प्रदर्शन करण्यात आले व सदर रॅलीचा कार्यालयाच्या ठिकाणी समारोप करण्यात आला.
सदर प्रसंगी वाहतूक शाखा, धाराशिवचे पी.एस.आय. ठाकूर साहेब व त्यांचे सहकारी पोलीस नाईक पी.एन. शेळके व पी.सी. कोळी, वाहन चालक कोळगे उपस्थित होते.
तसेच उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक .एम.जी.सी. शेख, . प्रशांत भांगे, श्रीकांत शिंदे, . मारुती चौगले, . एम.बी. रायबान, सचिन बंग, . दत्तात्रय पांडकर, श्रीमती त्रिवेणी गालिंदे,. प्रसाद पवार, . सतीश धुंदे व सहा. मोटार वाहन निरीक्षक श्रीमती पूनम पौळ,. कुणाल होले, संजय नकाते, . सिध्देश्वर मस्के, कुलदीप पवार, अक्षय बदर, . अजित पवार, सागर काशविद व कर्मचारी वर्ग मुख्य लिपीक धनंजय केरबा लोंढे, वरीष्ठ लिपीक . आर. पी. नाईकवाडे, . नरसिहं कुलकर्णी, रामचंद्रजी कुलकर्णी, . ए.आर. राऊत कनिष्ठ लिपीक . अण्णासाहेब सुभेदार, शप्रफुल्ल आलमले, बालाजी वाघमारे, श्रीमती संध्याराणी गवाड, शिपाई महंमद इकबाल इत्यादी उपस्थित राहून 35 वा रस्ता सुरक्षा अभियान 2024 चा समारोप करण्यात आला.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.