ताज्या घडामोडी

मंगरूळ येथील जिल्हा परिषद शाळेत आनंद बाजार मेळावा उत्साहात साजरा 

 

कळंब/जयनारायण दरक

चार भीतीच्या ज्ञानाचे धडे गिरवणाऱ्या बाल विद्यार्थी यांना भिंतीबाहेरच्या जगातील व्यवहार पण कळवा यासाठी कळंब तालुक्यातील मंगरूळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने आयोजित केलेल्या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या निमित्ताने शाळेने भरवलेल्या बाजार व्यवसायिक बनलेल्या विद्यार्थ्याकडून बाजार करून म्हणून आलेल्या ग्रामस्थांची खरेदीसाठी झुंबड उडाली होती.
शाळा म्हटलं की अध्ययन अध्यापन आलं परंतु या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांना शालेय जीवनात व्यवहार कौशल्याची तालीम मिळणेही तितकेच आवश्यक असते या अनुषंगाने आज रोजी शनिवार (२४/२/२०२४) मंगरूळ येथील जिल्हा परिषद शाळेने शाळेच्या आवारात बाल आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता. सकाळी आठ ते साडे अकरा पर्यंत चाललेल्या या उपक्रमात आठवडी बाजार विविध खाद्यपदार्थांची रेलचेल असलेली चौपाटी उपलब्ध होती. यावेळी पालेभाज्या,फळे, खाद्यपदार्थ मांडण्यात आले होते.
आनंद मेळाव्याची सुरुवात गावकऱ्याच्या वतीने करण्यात आली फीत कापून उद्घाटन करण्यात आले यावेळी शालेय समितीचे अध्यक्ष अनिल रितापुरे, जयनारायण दरक,अभिजीत (भैय्या)झाडके,राम माळी, किरण रितापुरे,दीपक कुंभार, इनुसभाई पठाण व मुख्याध्यापक मुंढे जी.डी, गायकवाड एस.एस, आकोसकर बी. व्ही, जगताप बी.एम, श्रीमती ढेपे ए.एन, श्रीमती भोरे एस.जे, श्रीमती घुटे एन.पी. व इतर ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच गावातील पालक महिला मुला मुलींनी भेट देऊन व खरेदी करून नऊ ते दहा हजार रुपयाची उलाढाल झाली असून हा मेळावा दुपारी साडेअकरा वाजेपर्यंत बाजार चालला यापुढेही अशीच चांगली उपक्रम राबवून गावाचे नाव रोशन होईल असे ग्रामस्थांमधून बोलली जात होते गावातील ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे सहकार्य करून हा आनंद मेळावा मोठ्या उत्सवात संपन्न झाला.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.