गरोदर महिलेला चावला होता कुत्रा कंपाऊंडरने दिले गर्भपाताचे इंजेक्शन
दहीफळ प्राथमिक आरोग्य केंद्रात खळबळजनक प्रकार.

.
दहिफळ प्रतिनिधी -योगराज पांचाळ
कळंब तालुक्यातील दहिफळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र नेहमी कोणत्या का होईना कारणाने सतत चर्चेत असते.नेमका दवाखाना उपचारासाठी आहे का रुग्णांच्या आरोग्याशी खेळ मांडला आहे हा प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडत आहे.
दि २५/२/२०२४ रोजी अवधूतवाडी येथील पुनम नितीन अवधूत यांना कुत्रा चावला होता.त्या चार महिन्यांच्या गर्भवती आहेत.प्राथमिक आरोग्य केंद्र दहिफळ येथे कुत्रा चावला म्हणून लस टोचून घेण्यासाठी आल्या होत्या.त्यावेळी गर्भवती असल्यामुळे लस देता येत नाही तुम्ही जिल्हा रुग्णालयात जा असे म्हणून पाठवून दिले.स्त्री रुग्णालयात पुनम अवधूत यांना कुत्र्यावरील लस दिली पुढील उपचार दहिफळ येथे घ्या म्हणून सांगितले.दुसरी लस प्राथमिक आरोग्य केंद्रात घेण्यात आली.जेव्हा तिसरी लस घेण्यासाठी गेल्यावर डाॅक्टर उपस्थित नव्हते.कंपाउंडरने लस दिली परंतु ती कुत्र्याची नव्हती.तर गर्भपाताचे इंजेक्शन होते.
ज्यांची दिवटी होती ते नेमकं कुठे होते.सिस्टरने इंजेक्शन का दिले नाही.असा सवाल उपस्थित होत आहे.
गर्भपाताचे इंजेक्शन दिल्यामुळे घरी गेल्यावर पुनम अवधूत यांना त्रास होऊ लागला.पती नितीन अवधूत यांनी ताबडतोब स्त्री रुग्णालय धाराशिव मध्ये दाखल केले.तिथे खळबळजनक प्रकार उघडकीस आला.
वेळीच दाखल केल्यामुळे बाळ सुरक्षित आहे.आईची तब्येत ठीक आहे.झालेल्या प्रकारामुळे मात्र पुन्हा एकदा आरोग्य केंद्राचा सावळा गोंधळ चव्हाट्यावर आला आहे.
नितीन अवधूत यांनी पोलिस स्टेशन येरमाळा,जिल्हा पोलीस अधिक्षक, जिल्हाधिकारी कार्यालयात लेखी तक्रार दाखल केली आहे.संबंधितावर काय कार्यवाही होते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.