ताज्या घडामोडी

गर्भवती महिलेला चुकीचे इंजेक्शन दिल्याप्रकरणी अधिकाऱ्यावर कारवाई करत आरोग्य सेवक निलंबित

कळंब/ जयनारायण दरक

कळंब तालुक्यातील दहिफळ येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये गर्भवती महिलेला चुकीचे इंजेक्शन दिल्याप्रकरणी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनक घोष यांनी कठोर कारवाई करत दोन वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सेवा तत्काळ समाप्त केले आहेत. तर एका नियमित वैद्यकीय अधिकाऱ्याच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवलेला आहे.
अधिकार नसताना चुकीचे इंजेक्शन देणाऱ्या आरोग्य सेवकाचे निलंबन करण्यात आले आहे‌. जिल्ह्यात गुणवत्ता पूर्ण आरोग्य सेवा देण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात येत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जा सुधारून एनकयुएएस मानांकन मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून जिल्ह्यातील १२ प्राथमिक आरोग्य केंद्राची राज्य पातळीवरील तपासणी पूर्ण झालेली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील बाह्य रुग्ण तसेच प्रसूतीचे प्रमाण वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. राज्य पातळीवरील रॅकीगमध्ये जिल्हा परिषद आरोग्य विभाग सातत्याने राज्यात पहिल्या पाच जिल्ह्यात स्थान टिकून आहे. तसेच क्षयरोग निर्मूलन व कुष्ठरोग निर्मूलनात देखील जिल्हे आणि राज्यात उत्कृष्ट काम केले आहे.
सर्व आरोग्यविषयक राष्ट्रीय कार्यक्रम प्रभावीपणे राबवून आरोग्य सेवेचा दर्जा उच्च राखत असताना निष्काळजीपणे वागणारे अधिकारी व कर्मचारी यांच्यावर यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियमित उपस्थिती आधार लिंक बायोमेट्रिकद्वारे तपासण्यात येते. कार्यक्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामावर देखरेख करण्यासाठी लवकरच जी.पी.एस. हजेरी प्रणाली राबविण्याचा आरोग्य विभागाचा मानस आहे.
या प्रकरणातील गर्भवती मातेची प्रकृती स्थिर असून सध्या स्थितीत माता व बालक सुरक्षित आहेत.दर १५ दिवसाला या मातेची तपासणी केली जाणार आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास यांनी दिली. ही बातमी सा.तेरणा काठीने प्रकाशित केली असता प्रशासन जागे होऊन दणक्यात अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.