येरमाळा येथे व्यावसायिक प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन

येरमाळा प्रतिनिधी
कळंब तालुक्यातील येरमाळा येथे आय.सी.आय.सी.आय फाउंडेशन आणि ग्राम पंचायत येरमाळा यांच्या संयुक्तीक विद्यमानाने आयोजित व्यावसायिक प्रशिक्षण केंद्राचे शुक्रवारी (दि.१२) उद्घाटन करण्यात आले. यावेळी पहिल्याच दिवशी ३० जणांनी या केंद्रात नोंदणी केली. येरमाळा आणि परिसरातील तरुण व बेरोजगारांसाठी हे प्रशिक्षण केंद्र ग्रामीण कौशल्य विकास उपक्रमा अंतर्गत सुरू करण्यात आले आहे. प्रशिक्षण केंद्राच्या स्थापनेमागील भावना आपल्या प्रस्तावनेत मांडताना विकास अधिकारी राजेश कांबळे यांनी, दहा वर्षे शहरी भागात असलेल्या प्रशिक्षण केंद्रांना आता ग्रामीण भागात स्थापन करून खेड्यापाड्यातील तरुणांपर्यंत व्यावसायिक कौशल्य पोहोचवण्याचे उद्दीष्ट ठेवून आयसीआयसीआय फाउंडेशन कार्य करत असल्याचे संगितले.
यावेळी सरपंच सौ. मंदाकिनी बारकुल, प्रिया बारकुल, माजी सरपंच विकास बारकुल, प्रा. अंकुश पाटील, .पी. एम. बारकुल, जि.प. सदस्य मदन बारकुल, कुंदन कांबळे, यांनी ही मार्गदर्शन केले. आयसीआयसीआय फाउंडेशन ग्रामीण भागात १ महिन्याचे व्यावसायिक अभ्यासक्रम राबवत आहे. आठवी पास १८ ते ३५ वयोगटातील तरुण, तरुणी यामध्ये सहभाग घेऊ शकतात. . पाहिल्याच दिवशी ३० प्रशिक्षणार्थीची नोंदणी झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश राऊत यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे नियोजन विश्वास लोमटे, रोहित भांडवले यांनी केले तर कार्यक्रमासाठी सहकार्य ग्रामपंचायत कार्यालयाचे क्लार्क प्रितेश बारकुल यांनी केले.