ताज्या घडामोडी

पोलीसांची सतर्कता व कडकनाथवाडीच्या जगतापची इमानदारी यामुळे मिळाला लाखो रुपयांचा ऐवज परत

येरमाळा —–

सोलापुर-धुळे महामार्गावर मोटारसायकल वरुन प्रवास करताना सोन्याच्या दागिण्यासह पिशवी पडुन लाखो रुपयाचा ऐवज रस्त्यावर पडला होता यामध्ये येरमाळा पोलिसांनी तात्काळ दखल घेत ऐवज परत मिळहुन दिला
याबाबत अधिक माहीती अशी की आज दि.२ रोजी सकाळी १२ वाजेच्या सुमारास येडशी येथिल अभिमन्यु ञिंबक पवार व त्यांची बहीण नंदिनी नंदु शिंदे या येडशी येथुन तेरखेडा येथे जात असताना महामार्गावर त्यांची पिशवी (पर्स) पडली या पर्समध्ये सोन्याचे चार तोळ्याचे गठण व मोबाईल असे मिळुन अंदाजे दोन लाख सत्तेचाळीस हजार रुपयाचा ऐवज हरवला असल्याची माहिती येरमाळा पोलिस ठाण्यामध्ये येऊन दिली असता सपोनि विलास हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि पवन निबांळकर ,पोलिस कर्मचारी परमेश्वर कदम,सचिन राऊत यांची तात्काळ तपास चक्रे फिरवत मोबाईलचे लॉकेशन काढले असता कडकनाथवाडी येथिल आत्माराम जगताप यांना रस्त्यामध्ये पर्स सापडल्याने ते घेऊन गावाकडे आल्याचे सांंगितले यांच्याकडील पर्स ताब्यात घेऊन येरमाळा पोलिसांनी शिंदे यांना सोन्याच्या दागिणे व मोबाईलसह लाखो रुपयांचा ऐवज परत दिला

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.