ताज्या घडामोडी

आर्दश शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल समाधान बेदरे सर यांचा येरमाळा पत्रकार संघाच्या वतीने सत्कार

तेरणा काठ न्युज 
श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संस्थेअंतर्गत दिला जाणारा माध्यमिक शिक्षकांमधील आदर्श शिक्षक पुरस्कार श्री समाधान बेद्रे सर यांना मिळाल्याबद्दल येरमाळा पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला
आपल्या मनमिळावू स्वभावामुळे सर्वांना आपलेसे करणारे व आपल्या कामात तत्पर असणारे स्वकार्यात सदैव धडाडीने काम करत युवकापुढे आदर्श निर्माण करणारे सध्या बार्शी तालुक्यातील चारे येथील माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असलेले समाधान बेंद्रे यांनी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी गोडी निर्माण केली आहे तसेच होस्टेलच्या माध्यमातून गरीब विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी सोय केली आहे सतत सामाजिक कार्यक्रमात सहभागी असणारे समाधान बेंद्रे सर यांची श्री शिवाजी शिक्षण मंडळाने दखल घेऊन त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार दिला आहे याबद्दल येरमाळा पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन बारकुल उपाध्यक्ष दीपक बारकुल सचिव दत्ता बारकुल सुधीर लोमटे मिलिंद देशमुख सुखदेव गायके बालाजी बारकुल तानाजी बारकुल ,संतोष बारकुल यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.