ताज्या घडामोडी

महसूल कर्मचारी 15 जुलै पासून बेमुदत काम बंद आंदोलनावर

महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या विविध प्रलंबित मागण्या संदर्भात शासन स्तरावरून कोणतीही सकारात्मक कारवाई होत नसल्याने कर्मचारी सोमवार 15 जुलै पासून बेमुदत काम बंद आंदोलनावर गेले आहेत. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे महसूलची कामे ठप्प पडली आहेत.
नवीन सुधारित आकृतीबंधानुसार महसूल विभागात कर्मचाऱ्यांना सामावून घ्यावे, कर्मचाऱ्यांचे वेतन, वैद्यकीय देयक नियमित द्यावेत, महसूल सहाय्यक व तलाठी त्यांचा ग्रेड पे वाढवावा, महसूल विभागात एकच परीक्षा पद्धत करण्यात यावी या प्रमुख व इतर मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने बुधवार 10 जुलैपासून विविध मार्गाने आंदोलन करण्यात येत आहे.
काळया फिती लावून काम करणे,
जेवणाच्या सुट्टीत कार्यालयाच्या गेटवर निदर्शन , लेखणी बंद आंदोलन करण्यात आले.
मात्र मागणीकडे शासनाचे दुर्लक्ष झाले. अखेर सोमवार 15 जुलैपासून महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालयातील कामकाज ठप्प पडले आहेत.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.