नाचू कीर्तनाचे रंगी !! ज्ञानदीप लावू जगी….

तेरणा काठ न्युज
कळंब तालुक्यातील मंगरूळ येथे या संत नामदेवांच्या अभंगाप्रमाणे आषाढी एकादशीनिमित्त जि प प्रा शाळेमध्ये बाल दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांबरोबरच गावातील वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या बालदिंडीसाठी शाळेने गावकऱ्यांच्या मदतीने सांप्रदायिक पोशाख, भगवी पताका, मृदंग, टाळ, वीणा आणि विठुरायाची पालखी अशी जोरदार तयारी केली होती . प्रथम विठुरायाची पूजा करून पालखीचे प्रस्थान झाले. गावकऱ्यांनी जागोजागी आपापल्या दारामध्ये रांगोळी काढून पालखीचे स्वागत केले. पालखीची पूजा करण्यासाठी महिलांनी रांगा लावल्या होत्या. जागोजागी पालखीमध्ये महिला, लहान थोर मंडळी मोठ्या उत्साहाने सहभागी होत होती. विसाव्याच्या ठिकाणी आपले वय, देहभान विसरून विठ्ठलाचा नामघोष करत फुगडी खेळण्यांमध्ये गावकरी रंगून गेली.
यामध्ये गावकऱ्यासोबत विशेष ग्रामविकास अधिकारी बी. व्ही.सोनवणे साहेब यांनी देखील भाग घेतला होता .
पालखीच्या प्रवासामध्ये जागोजागी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. यामध्ये मंगरूळ गावच्या सरपंच श्रीमती केवळबाई शिंदे, कपिल रितापुरे, दत्तात्रय रितापुरे, विलास भराडे, कपिल जाधव, हरीध्यानी (मुन्नी) रामरतन रितापुरे यांचा समावेश होतो तर भागचंद बागरेचा यांच्यातर्फे साऊंड सिस्टिम ची व्यवस्था करण्यात आली होती.
या दिंडीच्या यशस्वीतेसाठी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अनिल रितापुरे, व सर्व सदस्य, समाधान कानडे, अभिजीत झाडके, विलास भराडे, प्रशांत जाधव, काकासाहेब जाधव, ह भ प शिंपले महाराज या सर्वांचे सहकार्य लाभले. या दिंडीसाठी शाळेचे मुख्याध्यापक मुंडे जी डी व शिक्षक कांबळे जी एस, जगताप बी एम, गायकवाड एस एस, आकोसकर बी व्ही तसेच मॅडम श्रीमती रितापुरे आर पी, श्रीमती ढेपे ए एन, श्रीमती आगरकर आर एन, श्रीमती घुटे एन पी आणि श्रीमती भोरे एस जे यांनी परिश्रम घेतले.