ताज्या घडामोडी

कळंब तालुक्यातील रत्नापूरात भर दिवसा दरोडा::: सोने, रोख रकमेसह १६ लाखाचा ऐवज लंपास

 

कळंब जयनारायण दरक—–

कळंब तालुक्यायातील रत्नापुर येथे घरातील लोक बाहेर गेल्याचा डाव साधत चोरट्यांनी गावातील अंगणवाडी सेविका उषाबाई महादेव जाधवर यांच्या घराचे कुलूप तोडून,घरात प्रवेश करत कपाटाचे कुलूप तोडून २२ तोळे सोने,रोख रक्कम पंच्यान्नव हजार रुपयासह अंदाजे १६ लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना शनिवार ता.३० रोजी भरदुपारी २ ते वाजेच्या सुमारास घडली.
रत्नापुर येथील अंगणवाडी सेविका उषाबाई महादेव जाधवर या मुलीच्या गावी गेल्या होत्या त्यांचे पती महादेव विश्वनाथ जाधवर हे घरी होते.शेतात ज्वारी मळणीसाठी मळणी यंत्र आल्याचा निरोप आल्याने ते घराला कुलूप लाऊन शेतात गेले असता २ ते ३ वाजे दरम्यान घरात कोणी नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत कपाटाचे कुलूप तोडून कपाटातील रोख रक्कम ९५००० व अंदाजे २२ तोळे सोन्याचे दागिने असे अंदाजे १६ लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने लांबवल्याची घटना शनिवारी (ता.३०) रोजी घडली.
अंगणवाडी सेविका उषाबाई जाधवर या दुपारीच मुलीच्या गावाहून रत्नापुर येथे परतल्या होत्या त्याही पाटीवर बसमधून उतरुन मळणी यंत्र शेतात आल्याने थेट शेतात गेल्या ज्वारी मळणी झाल्या नंतर घरी परतल्यावर सदरील प्रकार उघडकीस आला.
या प्रकाराने उषाबाई जाधवर यांना चांगलाच मानसिक धक्का बसल्याने पोलिसात अद्याप घरातील किती ऐवज चोरी गेला या बाबत तक्रार दिली नसली तरी घटना स्थळाला स्थानिक पोलीस अधिकारी यांनी भेट देवुन पाहणी करुन स्वान पथक,फॉरेन्सिक तपासणी पथकाला पाचारण करण्यात आले होते. दिवसा ढवळ्या घडलेल्या या चोरीच्या प्रकरणाने रत्नापुर ग्रामस्थांसह परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.