ताज्या घडामोडी
कळंब पोलिसांची मोठी कारवाई करून 13 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद

कळंब/जयनारायण दरक-
कळंब.पोलीस स्टेशन कळंब येथील गुरन 08/2011 कलम 392,34 भादवी मधिल पाहीजे आरोपी सूर्यकांत रामकिसन गंगणे वय 43 वर्ष रा. कुत्तरविहीर अंबाजोगाई जि. बिड हा गुन्हा घडल्यापासुन तब्बल 13 वर्ष फरार होता. त्यास दिनांक 11/04/24 रोजी अथक प्रयत्न करून मोठ्या शिथापिने ताब्यात घेवुन त्याचे नावाची व पत्यांची तसेच मा. न्यायालयात दाखल केकेल्या कागदपत्राची खात्री करून त्यास दिनांक 12/04/2024 रोजी अटक करुन जेरबंद करण्यात आले आहे. यास ताब्यात घेवुन आज रोजी अटक करण्यात आली आहे.
सदरील कारवाई . पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवि सानप, पोलीस उप निरीक्षक रामचंद्र बहुरे, पोना दत्तात्रय शिंदे, पोना शिवाजी राऊत, पोना अभिजीत देशमुख यांनी केली आहे.