ताज्या घडामोडी

जनहित पतसंस्थेच्या शिरपेचात मानाचा तिसऱ्यांदा दिपस्तंभ पुरस्काराचा तुरा

तेरणा काठ न्युज
धाराशिव जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या येरमाळा येथील जनहित पतसंस्थेनी ग्राहकांची विश्वासार्हता संपादित करुन सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी व महाराष्ट्रातील पतसंस्था चळवळीसाठी दिपस्तंभाप्रमाणे कार्य करुन पतसंस्था चळवळीत चांगली कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन .मुंबई यांच्या वतीने सलग तिसऱ्यांदा सहकार क्षेत्रातील मानाचा व प्रतिष्ठेचा असा समजला जाणारा राज्यस्तरीय दिपस्तंभ पुरस्कार नुकताच जाहीर झाला असून हैद्राबाद येथील रामोजी फिल्मसिटी याठिकाणी दि.3 व 4 ऑगस्ट 2024 रोजी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
येरमाळा येथील जनहित पतसंस्थेला 2024 चा छत्रपती संभाजीनगर विभागातून १० कोटी ते ३० कोटी गटातून प्रथम क्रमांक मिळाला आहे, जनहित पतसंस्था २००५ पासुन म्हणजे गेल्या २० वर्षापासुन येरमाळा व पंचक्रोशीत अर्थकारणावर कार्य करीत आहे आजपर्यत संस्थेला महाराष्ट्र शासनाचे सहकाररत्न बॅको कर्णाडबॅकिंग पासुन फेडरेशनचा सलग तिसऱ्यांदा दिपस्तभ पुरस्कार मिळाला आहे याचे वितरण रामोजी फिल्मसिटी हैद्राबाद येथे दि ३ व ४ ऑगस्ट 2024 रोजी प्रदान करण्यात येणार आहे
या यशाबदल संस्थापक प्रा संतोष तौर चेअरमन सौ श्रुती माशाळकर व्हा चेअरमन नितिन कवडे सचिव दत्ता रणसिंग संचालक बळीराम नवले गोवर्धान उगडे रामकिसन कोकाटे गणेश मोरे सुनिल शिंदे अंकुश भगत सौ संगीता जाधवर व्यवस्थापक शिवप्रसाद घेवारे संस्थेचे कायदे विषयक सल्लागार ॲड व्ही के माने व ॲड महेंद्र कासार , मार्गदर्शक वल्लभ माशाळकर कर्मचारी समाधान भगत अभिजीत पाटील रमेश बारकुल पवन ओव्हाळ निशांत कांबळे रोहीत घेवारे निकीता वेदपाठक जीवन जाधव यांच्या सह सर्व खातेदार ठेवीदार सभासद व्यापारी उद्योजक व समस्त गावकरी यांनी जनहीत परिवाराचे अभिनंदन केले आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.