ताज्या घडामोडी

संपर्क फाउंडेशन मार्फत धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात २० शाळांना संपर्क टीव्ही डिवाइस वितरण

संपर्क फाउंडेशनच्या माध्यमातून तुळजापूर तालुक्यातील २० शाळांना संपर्क टीव्ही डिवाइस वाटप करण्यात आले. संपर्क टीव्ही डिवाइस हे संपर्क फाउंडेशनचा नवाचार आहे जे की ऑफलाइन असून याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रम आहे. ज्यामध्ये  वर्ग १ ते ५ च्या अभ्यासक्रम आधारित लेसन प्लॅन, लेसन व्हिडिओ, वर्कशीट, गेमिफाईड असेसमेंट अशा संसाधनांचा समावेश आहे. जे अध्यापन व अध्ययन प्रक्रिया सुलभ करण्यात मदत करते.

संपर्क फाऊंडेशन ही ग्रेटर नोएडा स्थित सामाजिक संस्था असून देशभरात ८ राज्यात तर महाराष्ट्रात एकूण १० जिल्ह्यात सरकारी शाळांत अध्ययन निष्पती वाढविण्यासाठी योगदान देतेय अशी माहिती कार्यक्रम समन्वयक अक्षय शिनगारे यांनी दिली.

यावेळी संपर्क फाऊंडेशन प्रतिनिधी संदीप वाघ उपस्थित होते. तसेच साधन व्यक्ती संदीप उंडे सर यांचे सहकार्य लाभले.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.