महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारासाठी घोगरे यांच्या कॉर्नर बैठका .

धाराशिव लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारासाठी भा.ज.पा.चे जिल्हा उपाध्यक्ष संजय घोगरे यांनी गावोगाव जाऊन कॉर्नर बैठकांचा सपाटा लावला आहे.
अधिक वृत असे की , महायुतीच्या उमेदवार सौ अर्चना पाटील यांच्या प्रचारासाठी व त्यांचा विजय मोठ्या मताधिक्याने व्हावा यासाठी कळंब तालुक्यातील सर्व भा.ज.पा कार्यकर्ते जोमाने कामाला लागल्याचे चित्र दिसत आहे त्याचबरोबर पदाधिकारी ही नेटाने कामाला लागल्याचे दिसते भा.ज.पा.चे जिल्हा उपाध्यक्ष संजय घोगरे यांनीही पाटील यांच्या प्रचारासाठी कॉर्नर बैठका चालू केल्या आहेत एकुरका येथे घोगरे यांनी कॉर्नर बैठक घेतली त्या बैठकीच्या अध्यक्ष स्थानी मा. सरपंच शरद भिसे हे होते त्या बैठकीत बोलताना विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर जोरदार टीका केली तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेसाठी दिलेल्या विविध योजना ज्यामध्ये मोफत धान्य किसान सन्मान योजना, रस्ते, पेयजल योजना, पर्यटनाचा विकास ,विश्वकर्मा योजना, राम मंदिर ,वंदे भारत रेल्वे अशा विविध योजनांची माहिती घोगरे यांनी सांगितली सदर बैठकीला मा . सरपंच शरद भिसे ,बाळासाहेब यादव ,सुभाष पवार ,चंद्रकांत घोगरे ,आबा आदनाक ,अमोल यादव ,समाधान यादव ,विश्वनाथ भिसे ,संदीप गुंड ,अमोल घोगरे बलभीम जाधव आदी जण उपस्थित होते