पारा प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया शिबीरात दोन तास अंधार;

कळंब/जयनारायण दरक
रुग्णांचे गरमिने अतोनात हाल.
#वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष; रुग्ण कल्याण निधी जातो तरी कुठे?लोकप्रतिनिधींनीचे कानावर हात.
वाशी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र पारा येथे शनिवारी दि. 13 एप्रिल रोजी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर पार पडले. यामध्ये 18 लाभार्थी महिलांनी सहभाग नोंदवला होता.या महिलांना 12 एप्रिल रोजी दवाखान्यात ऍडमिट करण्यात आले होते.त्याचवेळी सायंकाळी लाईट दोन तास गेली. सदरील दवाखान्यात लाईटचे इन्व्हर्टर, बॅटरी किंवा उजेडासाठी तत्सम सुविधा उपलब्ध नव्हती.त्यामुळे रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना दोन तास अंधारात काढावे लागले.सध्या उन्हाळा सुरू असल्यामुळे सर्वांची घामाने लाहीलाही झाली.रुग्णांचा तसेच त्यांच्या नातेवाईकांचा खरपूस समाचार मच्छराने चांगलाच घेतला. यावेळी रुग्णांनी तसेच त्यांच्या नातेवाईकांनी आरोग्यं विभागावर नाराजी व्यक्त केली.
दुसऱ्या दिवशी दि.13 एप्रिल रोजी सकाळी स्त्री रोग तज्ञ डॉ.राहुल यंदे , तालुका आरोग्य अधिकारी डॉ.महिंद्रकर, पारा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.जाधव , डॉ.प्रियंका बिक्कड यांनी 18 लाभार्थी महिलांची शस्त्रक्रिया केली.यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ राऊत , डॉ दिनेश तांबडे , डॉ मगर मॅडम, आरोग्य सहाय्यीका श्रीम. मोराळे, अहीरे, आरोग्य सहा. मेटे, लाटे,येवते, आरोग्य कर्म. हांगे, आरोग्य सेविका पांढरे, शिंदे, पवार, चौधरी, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधि. लिखीते , वाहन चालक काशीद,गट प्रवर्तक चव्हाण मॅडम, परिचर विभुते, आशा कार्यकर्ती सर्व, जामदार, माळी, टाचतोडे, राशनकर, अर्धवेळ कर्मचारी श्रीम. गाडे, क्षिरसागर,साबळे, शिनगारे यावेळी उपस्थित होते.
#दरवर्षी चालू आर्थिक वर्षामध्ये प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णकल्याण निधी म्हणून पैसे येत असतात. या पैशाचा काय हिशोब होतो ते पैसे कुठे खर्च केले जातात? या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये इन्व्हर्टर नसेल सायंकाळी लाईट गेली तर रुग्णांनी याठिकाणी कसे राहायचे असा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे