बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थिनी अमरजा गिड्डे व दीक्षा आडसूळचा सत्कार.

कळंब :- ज्ञानेश्वर बालकाश्रम तांदूळवाडी रोड कळंब येथे आश्रमाचे संचालक ह. भ. प. महादेव महाराज अडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली दिं 22 मे रोजी आयोजित इयत्ता बारावी माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांन्त प्रमाणपत्र परीक्षेत विज्ञान शाखेतून 83% गुण घेऊन उत्तीर्ण झाल्याबद्दल ज्ञान प्रसार विद्यालय मोहा ची विद्यार्थिनी अमरजा संभाजी गिड्डे व शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी दीक्षा दत्तात्रेय अडसूळ 80 टक्के गुण घेऊन यश संपादन केले आहे याबद्दल त्यांचा सत्कार संत ज्ञानेश्वर बालक आश्रमाचे संचालक ह. भ. प .महादेव महाराज अडसूळ कार्यक्रमाचे अध्यक्ष व आश्रम संचारिका सरस्वती अडसूळ यांच्या हस्ते फेटा ,पुष्पहार व श्रीफळ देऊन करण्यात आला याप्रसंगी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुरेश टेकाळे, शिक्षक संघटनेचे अशोक शिंपले ,सामाजिक कार्यकर्ते शिवाजी गिड्डे ,सहशिक्षक बापू भंडारे , पालक संभाजी गिड्डे, श्रीधर अडसूळ यांची उपस्थिती होती उपस्थित मान्यवरांनी गुणवंत विद्यार्थिनींचे कौतुक व अभिनंदन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन माधवसिंग राजपूत यांनी तर आभार बंडू आबा ताटे यांनी मानले.