ताज्या घडामोडी

डॉ.संदीप तांबारे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

तेरणा काठ वृत्तसेवा::: येडाई व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक व आयुष इन्स्टिट्यूट जामगाव तालुका बार्शीचे संचालक डॉ  संदीप तांबारे यांच्या वाढदिवस व लग्न वाढदिवसाचे औचित्य साधून (१०फेब्रुवारी रोजी )रक्तदान शिबिर घेण्यात आले . या रक्तदान शिबिराचे उद्घाटन येरमाळा पोलीस ठाणे चे पीएसआय बाजीराव निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले .या रक्तदान शिबिरामध्ये येडाई व्यसनमुक्ती  केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी व इतर अनेक लोकांनी रक्तदान केले .या शिबिराला विशेष सहकार्य डॉक्टर असोसिएशन येरमाळा अध्यक्ष डॉक्टर राजकुमार घुगे यांचे लाभले .तसेच केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जाफरभाई शेख यांचे महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र मानवाधिकार संघटनेचे सिक्रेटरी म्हणून सिलेक्शन झाल्याबद्दल यांच्या सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अजेन्द्र शामकुळे  यांनी केले . हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी येरमाळा कबड्डी संघटनेचे सदस्य सोहेल पठाण यांनी  परिश्रम  केले .

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.