ताज्या घडामोडी

मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी घेतले श्री येडेश्वरी देवीच्या पालखीचे दर्शन

– मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी येडेश्वरी देवीच्या पालखीवर चुन्याचे पाच खडे टाकुन आशिर्वाद मागितले . महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत नवसाला पावणारी येडेश्वरी देवी अशी ख्याती असलेल्या श्री येडेश्वरी देवी चैत्र पोर्णिमेच्या चुना वेचण्याच्या कार्यक्रमाला हजेरी लावली . त्यांनी चुन्याचे पाच खडे वेचुन पालखीवर टाकत मराठा समाजाला आरक्षण मिळु दे असे येडेश्वरी देवीला साकडे घातले . श्री येडेश्वरी देवी ही नवसाला पावणारी देवी म्हणून मला अनुभव आहे .मी अनेक वर्षापासून चुना वेचून देवीच्या दर्शनासाठी येतो .माझे देवीला एकच साकडं आहे की उर्वरीत मराठा समाजाला ओबीसी मधुन आरक्षण मिळावे व सरकारला त्यासाठी सद्बुद्धी देवो. सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात पत्रकारांनी विचारले असता आमच्या साठी सर्व राजकीय पक्ष सारखेच आहेत . मी अथवा माझ्या समाजाने कोणालाही पाठींबा दिलेला नाही किंवा कोणाला पाडा असे सांगितले नाही. मराठा समाजाने कुठेही अपक्ष उमेदवारी भरलेली नाही. मी राजकीय माणुस नाही . मला राजकारणाशी कांही देणे घेणे नाही. आम्हाला महायुती व महाविकास आघाडी समान आहेत असे प्रसार माध्यंमाशी बोलताना सांगितले .

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.