ताज्या घडामोडी

जिल्हा स्तरीय कुस्ती स्पर्धेत येडशीच्या जनता विद्यालयाचे यश

तेरणा काठ न्युज

जिल्हा स्तरीय कुस्ती स्पर्धेत येडशीच्या जनता विद्यालयातील मल्लांनी बाजी मारली. यामध्ये यशराज बालाजी देशमुख याने ९२ किलो वजनामध्ये प्रथम क्रमांक पटकावला , ४८ किलो वजनी गटामध्ये आर्यन शरद साळुंके याने प्रथम कमांक मिळवला आहे . त्याच बरोबर ६२ किलो वजनी गटामध्ये ओंकार बालाजी पवार याने प्रथम क्रमांक मिळवून या तिघांनी विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी आपली निवड पक्की केली . तर आयान पटेल याने ७१ किलो वजनी गटामध्ये व्दितीय क्रमांक मिळवला .

धाराशिव येथील क्रिडा महर्षी शिवाजीराव नलावडे कुस्ती संकुल जिल्हा स्टेडियमवर शालेय कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या . ९२ किलो वजनी गटामध्ये जनता विद्यालय येडशी येथे शिक्षण घेणाऱ्या यशराज बालाजी देशमुख याने प्रथम क्रमांक मिळवून त्याने स्वतःसह जनता विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे . यशराज ची विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे यशराज ला पुढील काळात देशाचे प्रतिनिधीत्व करून गावाचे नाव लौकिक करायचे आहे असा मानस व्यक्त केला .येडशी येथीलच दुसरा मल्ल आयान जमीर पटेल याने ७१ किलो वजनी गटामध्ये व्दितीय क्रमांक मिळवला . हे दोन्ही मल्ल येडशी येथील शिवनेरी तालीम मध्ये सराव करत असतात . या दोघांच्याही यशामुळे त्यांचे वस्ताद आबा शेळके यांचेही विद्यालयाचे मुख्याध्यापक , शालेय समितीचे अध्यक्ष , सर्व शिक्षक , व शिक्षकेतर कर्मचारी यांनी  अभिनंदन केले आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.