धनगर ST आरक्षण अंमलबजावणी करून प्रमाणपत्र वाटप करावे या मागणी साठी आमरण उपोषणास बसलेल्या मल्हारश्रींचा चोराखळीत सत्कार

तेरणा काठ न्युज
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे आजोळ असलेल्या चोराखळी ता कळंब मध्ये सकल धनगर समाजाच्या वतीने पंढरपूर येथे धनगर ST आरक्षण अंमलबजावणी करून प्रमाणपत्र वाटप करावे या मागणीसाठी आमरण उपोषणास बसलेले मल्हारश्री उपोषणकर्ते दीपक भाऊ बोऱ्हाडे (जालना ), माऊली भाऊ हळवणकर (सोलापूर ), विजय भाऊ तमनर (अहिल्यादेवीनगर ), .यशवंत गायके (बीड ), योगेश धरम (पुणे ), गणेश दादा केसकर (सातारा)
सहर्ष स्वागत करून शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच खंडेराव आप्पा मैंदाड, विश्वंभर मैंदाड, पांडुरंग मैंदाड, हरिदादा मैंदाड, चंद्रकांत कोकाटे,नंदुबप्पा मैंदाड, भरत आण्णा मैदाड, श्रावण दादा इटकर, चंद्रकांत मैंदाड , राजु मैंदाड, आझाद शेख, महादेव बावकर, अमोल मैंदाड, विष्णू मैंदाड बिभीषण मैंदाड, तुकाराम गाढवे, बिरुदेव गाढवे, रविंद्र मैंदाड राजाभाऊ मैंदाड, विजयकुमार मैंदाड, सुभाष मैंदाड यांची उपस्थिती होती..