ताज्या घडामोडी

येडेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवास घटस्थापनेने आजपासुन होणार प्रारंभ

आई तुळजाभवानी मातेची धाकटी बहीण म्हणून अख्ख्या महाराष्ट्राला सुप्रसिद्ध असणारी व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येरमाळा येथील श्री येडेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवाचा आज रविवारपासून घटस्थापनेने प्रारंभ होत असून या महोत्सवासाठी मंदिर प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे .
यामध्ये येडेश्वरी मंदिराचा परिसर स्वच्छ करणे, मंदिरावर रंगरंगोटी, मंदिरातील चांदीचे आवरण असलेले खांब स्वच्छ करणे , मंदिरातील तांब्याच्या पितळाच्या मोठ्या वस्तू स्वच्छ करणे ,तसेच मंदिरावर तसेच मंदिर परिसरामध्ये आकर्षक अशी विद्युत रोषणाई अशी विविध कामे लगबगीने करण्यात आली आहेत  . तुळजाभवानीचे दर्शन झाल्यानंतर तुळजापुरला येणारा भाविक आवर्जून येरमाळाला दर्शनासाठी येतो नवरात्र काळात राज्यातील लोक तसेच परराज्यातील लोकं  नवरात्र काळात नवरात्र काळात हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात तसेच घटस्थापनेच्या दुसऱ्या दिवसापासून देवीच्या डोंगराला खेटा पूर्ण डोंगराला पाठीमागे न पाहता प्रदक्षिणा घालण्याची पद्धत रूढ झाल्याने लोक पाच दिवस भल्या पहाटेपासून खेटा घालतात नवरात्र महोत्सव तसेच चैत्र पौर्णिमा नारळी पौर्णिमा या यात्रेदरम्यान भाविक देवीच्या डोंगराला दोरा वाहून साकडे घालून नवस पूर्ण करतात .

# येडेश्वरी देवीच्या मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे मंदिराच्या शिखरावर तसेच पायऱ्यावर व मंदिर परिसरामध्ये व मंदिर परिसराच्या गाभाऱ्यामध्ये सुंदर अशी रोषणाई केल्याने मंदिरा परिसरात मंगलमय वातावरण तयार झाले आहे या रोषणाईमुळे मंदिर परिसरात स्वच्छ असा प्रकाश दिसत आहे

नवरात्र काळामध्ये येणाऱ्या भाविकांसाठी सुलभ दर्शन व्हावे यासाठी मंदिर संस्थांकडून दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच येणाऱ्या भाविकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व प्रदक्षिणा मार्गावरील रस्त्याची स्वच्छता व तसेच प्रदक्षिणा मार्गावर जागोजागी लाईटची व्यवस्था आदी कामे करण्यात आली आहे.

 

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.