ताज्या घडामोडी

पंतप्रधान  नरेंद्र मोदी अडचणीत सापडल्यास मी त्यांच्या मदतीला धावून जाणार – उद्धव ठाकरे

धाराशिव

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अडचणीत सापडल्यास मीही त्यांच्या मदतीला धावून जाणार , असे प्रतिपादन उद्धव ठाकरे यांनी धाराशिव लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या प्रचार सभेत दि.०४ मे शनिवारी बोलताना केले.

या बाबत सविस्तर वृत्त असे की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनएका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना म्हणाले की, स्व.बाळासाहेब ठाकरे यांचें माझ्यावर कर्ज आहे. ते माझ्यावर खूप प्रेम करत होते. मीही उद्धव ठाकरे यांच्यावर दवाखान्यात शस्त्रक्रिया सुरू असताना फोन करून त्यांची विचारपूस करायचो. त्यामुळे उद्धव ठाकरे अडचणीत आल्यावर मी त्यांच्या मदतीला धावून जाणार. नरेंद्र मोदींनी मुलाखतीतील वक्तव्यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मी ही मोदींच्या अडचणीच्या वेळी धावून जाणार आहे. पण मी ज्यावेळी दवाखान्यात होतो, त्यावेळी त्यांचे महाराष्ट्रातील चेले माझे सरकार पाडण्यासाठी टपलेले होते. या गोष्टी मोदींना माहिती नव्हत्या का ? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच हे सरकार गझणी सरकार आहे. असाही टोला यावेळी त्यांनी जनसमुदयास संबोधित करताना महायुती सरकारला लगावला. यावेळी ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास घाडगे-पाटील, संजय दुधगावकर यांच्यासह महाहाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.