पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र बहुरे व पोलीस हवलदार महादेव मुंडे अँटीकरप्शनच्या जाळ्यात

*तक्रारदार – पुरुष, वय 35 वर्षे*
➡ *आरोपी -1) रामचंद्र किसन बहुरे, पद- परिविक्षाधीन पोलीस उप-निरीक्षक , कळंब पोलीस ठाणे, जिल्हा धाराशीव.( वर्ग 02)*
*2) महादेव तात्याभाऊ मुंडे, वय-37 वर्षे, पद-पोलीस हवालदार, कळंब पोलीस ठाणे, जिल्हा धाराशीव.*
➡ *लाच मागणी पडताळणी:-*
दि. 19/07/2024
➡ *लाच स्विकारली -*
दि. 19/07/2024
➡ *लाच मागणी रक्कम – 5000/-रुपये*
➡ *लाच स्विकारली रक्कम -5000/- रुपये*
➡ *थोडक्यात हकिकत -*
यातील तक्रारदार यांचे मालकीचे उपळाई पाटी, सोलापुर धुळे महामार्ग, तालुका कळंब येथे दिनेश व्हेज/नॅानव्हेज या नावाचे रेस्टॅारंट असुन सदर धाब्या समोर काही दिवसापुर्वी ०३ शेळया व ०२ बकरे बेवारस मिळुन आले होते. सदर शेळया व बकरे तक्रारदार यांचे ताब्यात मिळालेबाबत तक्रारदार यांचेवर चोरीचा गुन्हा नोंद न करता तक्रारदार यांचेवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ११०/११७ अन्वये किरकोळ कारवाई केली व तक्रारदार यांना मदत केली म्हणुन यातील आलोसे परि. पोलीस उप निरीक्षक रामचंद्र बहुरे व पोलीस हवालदार महादेव मुंडे यांनी तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष बक्षीस म्हणुन 5000/- रुपये लाच रकमेची मागणी करुन
आलोसे पो.ह. मुंडे यांनी पंचासमक्ष 5000/- रुपये लाच रक्कम स्विकारली असता आलोसे पोउनि बहुरे व पो ह मुंडे यांना ताब्यात घेण्यात आले असुन पोलीस ठाणे कळंब, जिल्हा धाराशीव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.
▶️ *सापळा अधिकारी सिध्दाराम म्हेत्रे, पोलीस उप- अधीक्षक, ला.प्र.वि. धाराशिव मो. क्र. 9594658686*
*▶️ मार्गदर्शक – संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजी नगर .मो.न. 9923023361*
*▶️ मुकुंद आघाव अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजी नगर मो.नं. 98814 60103*
➡️ सापळा पथक – पोलीस अमलदार स.फौ. इफ्तेकार शेख, मधुकर जाधव, नागेश शेरकर.
*लोकसेवक अथवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी व्यक्ती कायदेशीर काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तर खालील नंबरवर संपर्क साधावा*
*कार्यालय 02472 222879*
टोल फ्री क्रमांक.1064