येरमाळा पत्रकार संघाचे पत्रकार भवन अभ्यासिका व्यायामशाळेच्या इमारतीचे भूमीपूजन

येरमाळा येथील येरमाळा पत्रकार बहुउद्देशीय सामाजिक संस्थेला राज्य शासनाच्या ग्रामविकास मंत्रालयाने अभ्यासिका व्यायामशाळेला पन्नास लाख रुपये निधी मंजुर केला आहे.या अभ्यासिका व्यायामशाळेच्या इमारतीचे भूमीपूजन माजी सरपंच तथा माजी पं.स. सभापती विकास बारकूल यांच्या हस्ते करण्यात आले.
येथील येरमाळा पत्रकार बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने ग्रामपंचायतीस गावातील विद्यार्थी,तरुणांना व्यायामशाळा बांधण्यासाठी जागेची बऱ्याच दिवसांपासून मागणी होती. यासाठी सतत पाठपुरावा केला होता.ग्राम पंचायतने जागा दिल्याने पत्रकार संस्थेच्या बऱ्याच दिवसापासूनच्या सामाजिक कामाच्या उद्देशाच्या मागणीला यश आले.गेल्या डिसेंबर महिन्यात अभ्यासिका व्यायामशाळेसाठी ग्रामविकास मंत्रालयाने पन्नास लाख निधीला मंजूर केला.इमारतीच्या कामाच्या प्रशासकीय स्तरावर सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या असुन अभ्यासिका,व्यायामशाळा इमारतीच्या प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याने या इमारतीच्या कामाचे माजी सरपंच विकास बारकूल यांच्या हस्ते नारळ फोडून भूमिपूजन करण्यात आले.
या वेळी उपसरपंच गणेश बारकूल, माजी जि.प.सदस्य मदन बारकूल,सोमा बारकूल,तानाजी बारकूल, खंडेराव भातलवंडे,सुधीर पायाळे,सुधाकर चिलवंत,तर पत्रकार बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सचिन बारकूल उपाध्यक्ष दीपक बारकुल,,सचिव दत्ता बारकूल,सदस्य बालाजी रमेश बारकूल,सुधीर लोमटे, दत्ता गायके,सुखदेव गायके,कल्लेश भोसले,मिलिंद देशमुख,उपास्थित होते.