ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार, पत्रकारांचे पाल्य यांच्यासह उत्कृष्ट पत्रकारांचा सन्मान

; 25 मे रोजी व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अधिवेशन येथे नाशिक संपन्न होत आहे. गंगापूर रोड स्थित गरुड झेप अकॅडमी येथे राज्यभरातील सुमारे 500 पत्रकार या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत.

दिल्ली येथील ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन होत असून. वाईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा संस्थापक संदीप काळे या कार्यक्रमा च्या अध्यक्षस्थानी असतील तर व्हॉइस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के, प्रदेश कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर, प्रदेश उपाध्यक्ष अजित कुंकूलोळ व प्राचार्य श्रीकांत सोनवणे हे प्रमुख अतिथी असतील
या अधिवेशनात ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार, पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्य वितरण, पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांना पुरस्कार व राज्यातील व्हाईस ऑफ मीडियाच्या तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष व विभाग प्रमुख आदींनी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांनाही पुरस्कार देण्यात येणार आहेत.
उत्तर महाराष्ट्रातील पत्रकारांच्या प्रश्नांवर व्यापक स्तरावर चर्चा करून त्यांचे प्रश्न समजावून घेत राज्य शासनाकडे या प्रश्नाच्या सोडवणीसाठी पाठपुरावा केला जाणार आहे.
बेघर पत्रकारांसाठी प्रत्येक जिल्हा शंभर घरे, पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक मदत, पत्रकारांना आधुनिक स्वरूपाचे कौशल्य प्रशिक्षण, पत्रकारांच्या कुटुंबाचे आरोग्य तपासणी व उपचार , सेवानिवृत्तीनंतर पत्रकारांच्या आरोग्याची काळजी या पंचसूत्रीवर वाईस ऑफ मीडिया देशात काम करीत आहे.
पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाच्या राज्यस्तरीय शुभारंभ याच अधिवेशनात होत आहे
दिनांक 25 मे रोजी दोन सत्रात होणारा या अधिवेशनात नंदुरबार धुळे जळगाव नाशिक व नगर जिल्ह्यातील सुमारे 500 पत्रकार उपस्थित राहतील असा विश्वास प्रदेश उपाध्यक्ष अजित कुंकूलोळ, उत्तर महाराष्ट्र विभागाचे प्रमुख डॉक्टर दिगंबर महाले वाईस ऑफ मीडियाचे नाशिक जिल्हा अध्यक्ष कुमार कडलग नंदुरबारचे जिल्हाध्यक्ष रमाकांत पाटील जळगावचे जिल्हाध्यक्ष मिलिंद टोके नाशिक जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी व नाशिक महानगर कार्यकारिणीचे पदाधिकारी तथा सदस्य यांनी व्यक्त केला आहे

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.