ताज्या घडामोडी

महिला उद्योजिका संघ उपक्रमाला गावागावातून वाढता प्रतिसाद

*उषा इंटरनॅशनल दिल्ली आणि
अफार्म यांच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सामाजिक संस्था धाराशिव* यांच्या अंतर्गत सुरू असलेल्या उषा शिलाई प्रकल्प कार्यक्रमा अंतर्गत पाडोळी तालुका जिल्हा धाराशिव येथील 30 महिलांना शिवणकाम व्यवसायाचे प्रमाणपत्र संस्थेचे संस्थापक पांडुरंग घोडके यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.आपल्या मार्गदर्शनात घोडके म्हणाले की, नवी उमेद घेऊन महिलांनी संस्थेसोबत राहून व्यवसाय वाढवावा यासाठी संस्था वेळोवेळी मार्गदर्शन करायला आणि मदत करायला तयार आहे याशिवाय महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी आम्ही अखंडितपणे कार्य करत आहोत..बुधवार दि.22.05.2024 रोजी आयोजित बैठकीत सर्व उद्योजिका यांच्या अडचणी जाणून घेतल्या..

*महिला उद्योजिका संघ उपक्रमाला गावागावातून वाढता प्रतिसाद*
साहित्यरत्न संस्थेच्या वतीने सुरू असलेल्या महिला उद्योजिका संघ या प्रकल्पांतर्गत गुरूवार दिनांक 23.05.2024 रोजी बरमगाव खुर्द आणि समुद्रवानी तालुका जिल्हा धाराशिव या ठिकाणी गावात व्यवसाय करणाऱ्या आणि नव्याने व्यवसाय सुरू करण्याची आवड असलेल्या महिला उद्योजिका यांची बैठक पांडुरंग घोडके यांनी घेतली. यामध्ये व्यवसाय निवड,मार्केटिंग,शासनाच्या विविध योजना आणि कर्ज प्रक्रिया याबद्दल महिलांना सविस्तर माहिती सांगितली आणि सदस्य नोंदणी करून घेण्यात आली..

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.