कौशल्य विकासाचे प्रशिक्षण घेउन महाराष्ट्र कौशल्य व रोजगारक्षम करावा – सहाय्यक आयुक्त संतोष राऊत

कळंब – शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कळंब येथे शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीर अंतर्गत समुपदेशन मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटक व प्रमुख वक्ते कौशल्य विकास व नाविन्यता विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा मंत्रालय विशेष कार्य अधिकारी संतोष राऊत व अध्यक्ष जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी प्रविण औताडे हे होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा कौशल्य विकास अधिकारी श्रीहरी सोळुंके, एन साई महाविद्यालय चे प्राचार्य जगदीश गवळी,संस्थेचे प्राचार्य केशव पवार, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळचे जिल्हा समन्वयक अर्जुन बारंगुळे, राईट वॉक फाऊंडेशनचे कृष्णा तांदळे हे उपस्थीत होते.
प्रमुख वक्ते सहाय्यक आयुक्त संतोष राऊत म्हणाले की, दहावी, बारावी नंतर पुढील शिक्षणासाठी संधी, त्याचबरोबर आयटीआय नंतरच्या पुढील शिक्षण त्यामध्ये तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम आणि त्यामधे असणाऱ्या रोजगार तसेच स्वयं रोजगारच्या संधी निर्माण कराव्यात. सध्या बाजारात काय चालते यावरून आपण कौशल्य आत्मसात केले पाहिजे. कौशल्य विकसित करून देशाबाहेर रोजगाराच्या संधी निर्माण करावी. असे राऊत यांनी सांगीतले.
शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीर अंतर्गत समुपदेशन मेळावा आणि दहावी , बारावी नंतर पुढील शिक्षण संधी सध्या राज्यभर कौशल्य विकास विभागा मार्फत राबविण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून हा कार्यक्रम दि.15 रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कळंब येथे आयोजित करण्यात आला होता .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शिल्पनिदेशक किरण झरकर व शिल्पनिदेशक मनोज चौधरी यानी केले. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी संस्थेचे प्राचार्य केशव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गटनिदेशक शामकांत डोंगे , मुख्यालीपिक रविचंद्र जगदाळे, शिल्पनीदेशक लक्ष्मण निर्मळ, अंकुश माळकर, अतुल वाघमारे, सुजित दंडणाईक , मंचक जाधव, वसंत टोपे, नदीम शेख, श्री कुट्वाड, अक्षय सुतार, कल्लेश भोसले, बालाजी पांचाळ, शिल्पनिदेशिका कल्पना जाधवर , ज्योती शिंदे, कोमल मेंडके, कल्याणी भराटे, वरीष्ठ लिपिक विलास सुरवसे, भांडारपाल बाजीराव राऊत, लिपिक महेश सौलखे, चतुर्थ श्रेणी कर्मचारीपप्पू मडके, रवींद्र जेटीथोर, फर्जना शेख यांच्यासोबत प्रशिक्षणार्यानी परिश्रम घेतले.
——————————————-