ताज्या घडामोडी

मुलींनी स्वतःच्या कौशल्यांचा उपयोग केला तर आत्मप्रगती होऊ शकते :: संतोष तौर

मुलींनी स्वतःच्या वेगवेगळ्या कौशल्यांचा उपयोग केला पाहिजे तरचं आत्मप्रगती होऊ शकते असे प्रतिपादन   राष्ट्रीय प्रशिक्षण प्रबोधिनीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या फॅशन डिझायनिंग प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी संतोष तौर  बोलत होते

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येरमाळा पोलीस स्टेशनचे  पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव होते यावेळी प्रबोधिनीचे शिवाजीराव पवार सौ विजयमाला कवडे सौ वैशाली राजेश शिरसाट ऋषीकेश उंकीरंडे उपस्थित होते  संतोष तौर बोलताना पुढे म्हणाले की ग्रामीण भागामध्ये व्यवसायाच्या विविध संधी असतात आणि महिला उत्तम काम करू शकतात त्यामुळे त्यांनी घेतलेल्या ज्ञानाचा उपयोग करून स्वतःचा व्यवसाय सुरू केला पाहिजे त्यासाठी लागणारी सर्व आर्थिक मदत वेगवेगळ्या संस्था आणि आम्ही सुद्धा पतसंस्था बँका यांच्या माध्यमातून करू असे सांगीतले यावेळी ३० मुलीना दोन महीने प्रशिक्षण देण्यात आले होते त्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले यावेळी येरमाळा आणि परिसरातील महीला मोठ्या प्रमाणात उपस्थीत होत्या

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.