ताज्या घडामोडी
सईद अहमद शेख यांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार

मुरूम,(प्रतिनिधी) : येथील डॉ. झाकीर हुसेन उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक सईद अहमद शेख यांचा सेवानिवृत्तीबद्दल संस्था व विद्यालयाच्या वतीने शनिवारी (ता. २९) रोजी विद्यालयात सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जमीर शिकलकर होते. यावेळी संस्थेचे संचालक मेहमूद बागवान यांच्या हस्ते सईद शेख यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक दुल्हा सगरी, सहशिक्षक खतीब मासुलदार, नूर कानकृती, सना बाबुडे, हनीफ बांगी, शहाजान पटेल, शिक्षकेत्तर कर्मचारी मेहबूब जमादार, पद्मिनी कांबळे, राहील सय्यद आदी कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक इम्तियाज जमादार यांनी केले. सुत्रसंचालन जुबेर अत्तार तर आभार रिजवान बागवान यांनी मानले.