ताज्या घडामोडी

दिव्यांग, दृष्टीहिनांची वारी निघाली यवतमाळ ते पंढरपुरी

तेरणा काठ न्युज/येरमाळा :

बा विठ्ठला…. सगळीकडे सुखसमुद्धी नांदू दे, अशी याचना घेऊन यवतमाळातून आषाढीनिमित्त दिव्यांग दृष्टीहिनांची पायी वारी हरिनामाच्या गजरात पंढरपूरकडे रवाना झाली. दि.१० जुलै रोजी येरमाळा गावी मुक्कामी आली असून दिव्यांगांची पंढरपुरात जाणारी ही महाराष्ट्रातील पहिलीच वारी ,दृष्टिहीनांची पाऊले चालती पंढरीची वाट… असं म्हणत विठ्ठलाच्या दारी निघालीआहे
यवतमाळ येथील सेवा समर्पण प्रतिष्ठान आणि दिव्यांग संघ यांच्या वतीने सदर वारीचे आयोजन करण्यात आले आहे. यवतमाळ येथील ओम सोसायटीतील अष्टविनायक गणपती मंदिरातून संत सूरदास यांची प्रतिमा व पादूका घेऊन ही वारी पंढरपूरकडे निघाली झाली. वारीचा पहिला मुक्काम भांब राजा येथे राहणार आहे. आर्णी, दिग्रस, पुसद, कळमनुरी, परभणी, परळी, अंबेजागाई, कळंब येरमाळा बार्शी,कुडूवाडी, पंढरपूर असा २२ दिवस ५२१ किमीचा पायी प्रवास करून दिव्यांग वारी पंढरपूर येथे पोहोचणार आहे. दररोज किमान २० ते २५ किमीचा प्रवास करत आहेत, मार्गात मुक्कामाच्या ठिकाणी भजन, कीर्तन असे कार्यक्रमही हे दृष्टिहीन बांधव घेत आहेत. या : वारीत दिव्यांग संघाचे संचालकव दिंडीचे सदानंद तायडे, गजानन मानकर, प्राची बनगिनवार, सोमनाथ अफुणे, बालाजी तपासकर, हनुमान डहाणे, विशाल चक्रे, गुड्डू अंबुडारे, माधव निंबलवार, प्रज्वल तुमसरे, यश गायकवाड, दुर्गा तुंबलवार, रीमा तोडकर, प्रणाली उईके, प्रमोद जगनाळे, फकीरा भालेराव, मनकर्णा यशवंत, संकेत गायकवाड यांच्यासह 25 जण सहभागी झाले आहेत. शेकडो वर्षांपासून पंढरपूर येथे राज्यभरातून वारकरी दिंडी घेऊन दाखल होतात. असंख्य दिव्यांग लोकही विविध वारीतून पंढरपूरला जातात. मात्र फक्त दिव्यांगांची पहिलीच स्वंत्रत दिंडी घेऊन दृष्टिहीन वारकरी पंढरपूर येथे पोहोचणार असून ते पंढरपूर येथे विठ्ठलाचे दर्शनही घेणार आहेत. येरमाळा नगरीत दिंडीचे स्वागत माजी पंचायत समिती सभापती विकास बारकुल, दशरथ जाधव संजय मोहिते यांनी दिंडीचे स्वागत केले यावेळी येरमाळा गावातील अनेक विठ्ठल भक्त उपस्थित होते.
दिव्यांगांची पहिलीच स्वतंत्र दिंडी
शेकडो वर्षांपासून पंढरपूर येथे वारकरी दिंडी घेऊन वाखल होतात. असंख्य दिव्यांग लोकही विविध वारीतून पंढरपूरला जातात. मात्र फक्त दिव्यांगांची स्वतंत्र वारी निघण्याची ही पहिलीच वेळ आहे. राज्यात हा ऐतिहासिक क्षण असून दिव्यांगांची पहिलीच स्वतंत्र दिंडी घेऊन दृष्टिहीन वारकरी हरिनामाचा गजर करत पंढरपूरकडे निघाले आहेत

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.