विद्यार्थ्यांनी क्षणिक सुख न बघता ,आयुष्य कसे सुखकर होईल यासाठी प्रयत्न करावेत – डॉ.आगलावे

तेरणा काठ न्युज/येरमाळा : –
येरमाळा ज्ञानोद्योग ज्युनिअर कॉलेज मधील विद्यार्थ्यांना अमेरीकेमध्ये शास्त्रज्ञ असलेल्या डॉ. बालाजी आगलावे यांनी आज मार्गदर्शन केले .बालाजी आगलावे हे ज्ञानोद्योग विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत त्यामुळे त्यांचा सत्काराचे आयोजन ज्ञानोद्योग ज्युनिअर कॉलेजमध्ये करण्यात आले होते .
येरमाळा येथील डॉ. श्री .बालाजी आगलावे हे अमेरीकेमध्ये शास्त्रज्ञ आहेत ते एम . एस .सी बायोटेक मध्ये पीएचडी धारक आहेत आणि अमेरिकेमध्ये शेती व्यवसाय व तसेच कंपनी अंतर्गत सी .ई .ओ या पदावर काम करतात श्री बालाजी आगलावे हे येरमाळा येथील ज्ञानोद्योग विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत त्यामुळे कॉलेजमध्ये त्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा . सुनिल पाटील होते . या कार्यक्रमामध्ये शाळेची कुस्तीपटू विद्यार्थीनी सृष्टी जमदाडे हिने राज्य स्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये भाग घेऊन पारीतोषीक मिळवल्यानिमीत्त तिचा बालाजी आगलावे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बालाजी आगलावे विद्यार्थ्यांनी क्षणीक सुखाच्या मागे न लागता पुढील आयुष्यामध्ये आपण सतत सुखी कसे राहु यासाठी प्रयत्न केले पाहीजेत . त्यासाठी चिकाटी , सातत्य व कष्ट असतील तर यश नक्कीच मिळते. नशिबावर अवलंबून न राहता कष्ट करणे गरजेचे आहे व कष्टाने यश मिळते त्यासोबत इंग्रजी संभाषण विदेशात महत्त्वाचे आहे. आवडत्या विषयात करिअर बनवा आणि इंग्रजी संभाषण कला अवगत करा. असे आवाहन विद्यार्थ्यांना केले .यावेळी प्रा . फुगारे सर , प्रा .सयाजी बारकुल , प्रा .विनोद बारकुल , प्रा . शिंदे , प्रा . कैलास जाधव , प्रा . कळसे मॅडम ,प्रा.किरण बारकुल सर,प्रा . हनुमंत कोकाटे , शरद बारकुल , देवानंद बारकुल , सिकंदर सय्यद , सूर्यकांत आगलावे , महेंद्र शिनगारे आदी मान्यवर उपस्थित होते .आभार प्रा . हनुमंत कोकाटे यांनी मानले .