ताज्या घडामोडी

बाबासाहेब ओहाळ यांच्या (मजुरी )कामाचा मोबदला न दिल्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात)पक्षाचेबेमुदत आमरण उपोषण

तेरणा काठ न्युज 

कामाचा मोबदला न दिल्यामुळे- मौ नायगाव ता. कळंब येथे पेयजल योजनेअंतर्गत पाणीपुरवठा विहिरीचे खोदकाम चालू होते. सन 2019–20 मध्ये या विहिरीचे खोदकाम करण्याचे काम विकास रामदास घोडगे व सुरेश चंद्रसेन कवडे या गुत्तेदारांनी घेतले होते या दोघांनी येथील बाबासाहेब ओव्हाळ यांना मजूर म्हणून कामावर लावले होते त्यांच्या कामाचा मोबदला या दोघांनी न दिल्यामुळे पक्षाच्या वतीने दि.13/08/ 2024 रोजी जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालय धाराशिव यांच्या समोर जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण करण्यात येणार आहे असे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे याबाबत माहिती अशी की, बाबासाहेब ओव्हाळ यांना दिवस- रात्रपाळीने मजूर म्हणून कामाला ठेवले दिवसाला दररोज तीनशे रुपये (300/)तर रात्रपाळीने साडेतीनशे रुपये (350/) मजुरी ठरवून कामाला लावले जवळपास तीन महिने सहा दिवस काम केले. श्री ओव्हाळ यांनी केलेल्या कामाचा (मजुरी)मोबदला अनेक वेळा मागितला परंतु त्यांच्या हिशोबाने प्रमाणे कामाचा मोबदला त्यांना अद्याप मिळालेला नाही त्यांच्या कामाचा मोबदला एकूण रुपये (बावन हजार चारशे)52400/इतका आहे त्यातील श्री सुरेश चंद्रसेन कवडे यांनी दि.18/2/2024 रोजी दहा हजार रुपये (10.000/)दिले.कवडे यांना बाकीचे पैसे मागितले असता ते म्हणाले की,मी त्यांना कामाला लावले नाही विकास घोडगे यांनी त्यांना कामाला लावले आहे त्यांचे सर्व पैसे विकास घोडगे यांच्याकडे दिले आहेत असे म्हणाले विकास घोडगे यांच्याकडून कसे पैसे घ्यायचे ते घ्या मी मध्ये पडणार नाही असे स्पष्ट सांगितले. विकास घोडगे यांना श्री ओव्हाळ यांनी वारंवार पैसे मागितले असता त्यानेही तुझे कशाचे पैसे मी तुझे सगळे पैसे दिले आहेत असे खोटे बोलून पैसे देण्याचे टाळले. ओव्हाळ हे जातीने बौद्ध व अशिक्षित असल्याने या दोघांनी ओव्हाळ आमचे काहीच करू शकत नाही या मानसिकतेतून पैसे दिले नाहीत. यापूर्वी दि.21/5/2024 रोजी आपणाला ओव्हाळ यांनी निवेदन देऊन कामाचा मोबदला (मजुरी)मिळवून देण्याची मागणी केली होती परंतु तीन महिन्याचा कालावधी उलटला तरी जिल्हा पोलीस अधीक्षक व शिराढोण पोलीस स्टेशन यांनी दखल न घेतल्यामुळे पक्षाच्या वतीने आमरण उपोषणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे बाबासाहेब ओव्हाळ यांचा कामाचा मोबदला तात्काळ मिळवून देण्यात यावा व

जातीय द्वेषभावनेतून पैसे न दिल्यामुळे संबंधित गुत्तेदारा यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात यावा शिराढोण पोलीस स्टेशनचे जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांनी संबंधित लोकांना पाठीशी घालून कर्तव्यात कसूर करून दप्तर दिरंगाई केल्यामुळे,त्यांच्यावर (प्रशासकीय) शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे यावेळी निवेदनावर उपोषणकर्ते म्हणून जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत, जिल्हा कार्याध्यक्ष महावीर गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब ओव्हाळ आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.